सांगोला विधानसभा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले. सांगोला आगारास नवीन पाच बसेस लवकरच मिळणार आहेत. याची माहिती आमदार बाबासाहेब देशमुख यांचे प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दिली आहे.