जालना शहरातील नागेवाडी येथे बेकायदेशीर देशी दारुची अवैधरित्या चोरटी विक्री करणार्यावर चंदनझीरा पोलीसांनी कारवाई करुन सुमारे 90 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सोमवार दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय. नागेवाडी येथे एक ईसम हा बेकायदेशीररित्या देशी दारुची चोरटी विक्री करीत असल्याची गुप्त माहिती चंदनझिरा पोलीसांना मिळाली होती. चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नागेवाडी पत्राचे घरावर छापा टाकून कारवाई केली.