एखाद्या व्यक्ती आपला नातेवाईक जवळचा आहे पण तो निवडणुकीत निवडून येऊ शकतो अशाच व्यक्तीला पालघर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिकीट मिळेल. मात्र एखाद्या व्यक्ती आपल्या जवळचा आहे पण तो निवडून येऊ शकत नाही त्याला तिकीट द्या असे म्हणाल तर ते चालणार नाही असे वक्तव्य राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मनोर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले आहे.