राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमीत शासन सेवेत समायोजन करण्याच्या संदर्भात राज्य शासनाने १४/३/२४ रोजी शासन निर्णय घेतला. परंतू दीड वर्षाचा कालावधी उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. १९ ऑगस्ट पासून या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर राष्ट्रीय आरोग्य अभियान एकीकरण समिती आणि एकता संघ महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.