सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील एका हॉटेल समोर महामार्गाच्या दोन्ही रस्त्याच्या दुभाजकात एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह सापडला असून, मोहोळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत त्याची अकस्मात मयत अशी नोंद केली असल्याची माहिती मोहोळ पोलिसांनी आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता दिली आहे. मोहोळ पोलीसा कडुन मिळालेल्या माहिती नुसार, सोलापूर पुणे महामार्गावर हाॅटेल सावजी असून, हाॅटेल समोरील महामार्गाच्या दोन्ही रस्त्याच्या दुभाजकात एक अज्ञात पुरूष बेवारस अवस्थेत पडला होता.