दोडामार्ग - तिलारी परिसरातून "ओंकार हत्ती" आता बांदा परिसरातील नेतर्डे भागात पोहोचला आहे. नेतर्डे - धनगरवाडी येथील पाणवठा भागात हत्ती स्थिरावल्याची माहिती वनविभागाने दिली. वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जलद कृती दलाचे जवान हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. तरी नागरिकांनी सावध राहावे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन वनविभागाने आज शनिवार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता गावात अनाउन्समेंटद्वारे केले आहे.