शासकीय कार्यालयात काम करतांना कर्मचारी आपल्या आवडी निवडी कडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण दिसून येतो, हा ताण तणाव कमी करण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या कामासोबतच आवडते छंद जोपासावेत असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी दु. 4 वाजता व्यक्त केले. जागतिक छायाचित्र दिन व जागतिक संस्कृती भाषा दिनाच्या निमिताने जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.