सध्या महाराष्ट्रसह सोलापूर जिल्हा 26, 27, 28 व 29 सप्टेंबर या दिवशी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले असून, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाच्या वरच्या भागात दुवाधार पाऊस पडल्याने कुरनूर धरणातून दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळ पासून 3000 क्यूसेक्स व नंतर 3800 क्यूसेक्सने विसर्ग वाढवण्यात आला असून, याच विसर्गाचा फटका अंदेवाडी गावाच्या गावकऱ्यांना बसला आहे. संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला असून, गेल्या 8 दिवसापासून गावचा संपर्क तुटला होता.