चिंबळी (ता.खेड) येथून चोरी गेलेली मोटार आळंदी पोलिसांनी आरोपीसह जप्त केली. चिंबळी गावातील सीसी टीव्ही कॅमेरा तपासून आरोपीचा मग काढला. अखेर मोशी (ता.हवेली) येथील स्वप्नपूर्ती इमारतीजवळ मोटार आणि आरोपी अजय बाबू शेळके, (वय ३३ वर्ष रा. डोंगरे वस्ती, मोई रोड, ता. खेड) याला मंगळवारी (ता. ९) ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.