आगामी गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलाद सण सुरळीत पार पडावा यासाठी नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी मंगळवारी दुपारी 2 वाजता पत्रकारांशी बोलताना केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, दोन्हीही सण एकोप्याने आणि शांततेत साजरे करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुशासनभंग होऊ नये यासाठी पोलीस दल सतर्क राहील.