आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाची युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी धारावीतील नागरिकांशी संवाद साधला आहे यावेळी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले धारावीतील नागरिकांना त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न पुनर्वसन काय होईल असाच पडला आहे तर भाजपला या ठिकाणी रोहिंग्या आणि बांगलादेशी का दिसतात हे मूळ धारावीकर आहेत असे आदित्य ठाकरे म्हणाले.