ऐन पोळा सणाच्या दिवशीच गडचिरोली जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आलेली आहे. पोळा सणाच्या निमित्ताने सुट्ट्या घेऊन शाळेतून घरी आलेला 6 वर्षीय चिमुकला गावालगत असलेल्या नाल्यात वाहून गेल्याचा प्रकार भामरागड तालुक्यात उघडकीस आला आहे. रिशान प्रकाश पुंगाटी, रा. कोयर ता. भामरागड असे मयत मुलाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार रिशान प्रकाश पुंगाटी हा कोयर येथील रहिवासी असून तो 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात शिक्षण घेत होता.