भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, विधानसभेला तुम्ही महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान केला होता त्यानंतर मतदारांनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. 90 जागा लढवल्या आणि 20 जागादेखील निवडून आणता आल्या नाही. आता बिहारमध्ये 283 जागा आहेत तिथे उबाठा किती जागा लढणार आणि किती जागेवर डिपॉझिट जप्त होईल हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.