28 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांनी लाकडी पुलाजवळ लोखंडी चाकू घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव नरेश सोनवणे वय 58 वर्ष असे सांगण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.