प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी तालुका जामनेर येथे स्तनपान सप्ताह निमित्त आशा अंगणवाडी सेविक गरोदर , स्तनदामाता यांची स्तनपान विषयी कार्यशाळा घेण्यात आली. स्तनपानाची योग्य पद्धत, स्तनपानाचे महत्त्व व फायदे सांगण्यात आले. जामनेर येथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुदर्शना सोनवणे, डॉक्टर आर के पाटील, डॉक्टर स्वप्निल सेतवाल तसेच बालरोग तज्ञ डॉक्टर प्रशांत महाजन जळगाव येथील रश डॉक्टर राहुल पाटील यांचे प्रशिक्षणअनमोल लाभले. प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी मोहित डॉक्टर मोहित कुमार जोहरे, H Aश्री गजानन माळी ,LHV राजश्री पाटील व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्यशाळेला योगदान लाभले.