मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या, मुंबईतील आंदोलनात सामील होण्यासाठी, सातारा जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मराठा समाज मुंबईला रवाना होणार आहे, त्यानिमित्त आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी, दुपारी बारा वाजता पोवई नाका शिवतीर्थावर, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून, मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून साताऱ्यात परत येणार नाही असा निर्धार घेण्यात आला.