बकऱ्यांना चारा आणण्यासाठी गेलेल्या चेतन वसंता बोर्डे (वय २२) या युवकाचा नदीच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने व पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि.१७ ऑगस्टरोजी चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे घडली होती. या युवकाच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी केली होती. तसेच, जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावाही केला होता.