जिल्हा परिषद बुलढाणा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग अंतर्गत पंचायत समिती नांदुरा व शिवपार्वती ग्रामविकास सामाजिक बहुउद्देशीय संस्था,पिंपरी गवळी यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान विशेष घटक योजना 2024 पंचवीस मध्ये अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबाला पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आज नांदुरा पंचायत समितीमध्ये करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते.