मुंबईकरांच्या गणेशोत्सवाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आज शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १० च्या सुमारास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आज मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विमानतळावर तमाम मुंबईकरांतर्फे स्वागत केले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार तसेच कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थितीत होते.