बार्शी तालुक्यातील सासुरे गावात सोमवारी रात्री एका धक्कादायक घटनेत ३८ वर्षीय गोविंद जगन्नाथ बर्गे या तरुणाचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. तो गाडीत मृतावस्थेत आढळला असून, त्याच्या डोक्यात गोळी लागलेली होती आणि गाडीत एक पिस्तूलही सापडले. पोलिसांनी सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे म्हटले असले, तरी त्यांना काही संशयास्पद बाबी आढळल्याने खुनाच्या दृष्टीनेही तपास केला जात असल्याची माहिती वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी 9 सप्टेंबर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दिली आहे.