अकोला बलात्कार प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने शेवगावच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे. अकोला शहरातील गुलजारपूरा भागात एका समाजातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तोहीत समीर नामक व्यक्तीने बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली असून आरोपी अद्याप फरार असल्याने संतप्त नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी सकल हिंदू समाज शेवगावच्या वतीने नायब तहसीलदार गौरी खट्टे यांना निवेदन देण्यात आलं.