वाळूचे डंपर घेण्यासाठी माहेरहून २० लाख रूपये आणावे या मागणीसाठी विवाहितेला शारिरीक व मानसिक छळ करून तिला जीवे ठार मारण्यात आले आहे, असा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी करत त्यांनी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पहूर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ठिय्या आंदोलन केले.