आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गोरेगाव शहरातील त्रिमूर्ती चौक येथील बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात थाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी विविध देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या या घोषणांनी सारे आसमंत निनादले होते. गणपती बाप्पाच्या विसर्जनादरम्यान विविध प्रकारचे देखावे बघण्यासाठी गोरेगाव वाशीयांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. यावेळी गणेश मंडळाचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. .