उदगीर शहरात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता, कुत्र्यांमुळे दहशत निर्माण झाली होती,दररोज कुत्रे चावा घेत असल्याच्या घटना समोर येत होत्या या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले होते,भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली होती, अखेर नगरपालिका प्रशासनाने १२ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजल्या पासून उदगीर शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली होती १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिराही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुत्र्यांची धरपकड सुरच ठेवली आहे