नागपूर-भंडारा महामार्गावरील सिंगोरी शिवारात वेगात आलेल्या मोटारसायकलने पायी जात असलेल्या शेतमजुराला जोरात धडक दिली. गंभीर दुखापत झाल्याने त्या शेतमजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रमोद वासुदेव बावणे वय 47 वर्षे राहणार सिंगोरी असे मृतकाचे नाव आहे. मृतक व सिंगोरी येथील काही मजूर शेतातील कामे आटोपून गावाकडे पायी जात असताना वेगात आलेल्या मोटारसायकलने धडक दिली. या धडकेत प्रमोदच घटनास्थळी मृत्यू झाला. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला .