लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि पगाराच्या पैशांची मागणी करून सतत मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावरून एका ३० वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळंब शहरात घडली आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कळंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मनिषा राजू शिंदे (वय ३०, रा. मुकबधीर शाळेच्या शेजारी, कळंब) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. माहिती पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी तीन वाजता दिली आहे.