आज शनिवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास भारतीय जनता पार्टी, एल. टी. रोड येथे विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष सेवा मंचाची व्यवस्था करण्यात आली होती. या मंचाला आमदार मनीषा चौधरी यांनी भेट देऊन भक्तांशी आत्मीय संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दहा दिवस भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाने साजरा झालेला गणेशोत्सव आज अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाने संपन्न होत आहे. बाप्पाला निरोप देताना मनात थोडासा भावुकपणा असला तरी पुढल्या वर्षीच्या आगमनाची आशा आनंद अधिकच उजळून निघतो.