काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बड्यावर 26 ऑगस्ट सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेने समाज सुन्न झाला. नगरपरिषदेच्या डम्पिंग साइटवरील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून बारा वर्षीय मूकबधिर मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान खड्ड्यातून त्या मुलाचा मृतदेह काढल्यानंतर त्याची आई कुशीत तो मृतदेह घेऊन बसली होती. यामुळे तेथे उपस्थित सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहू लागले मृतात मुलाचे नाव विराट राणा पवार असे सांगण्यात आले आहे. काटोल नगर परिषदेने कचरा डम्पिंग साठी मोठमोठे खड्डे खोदले