गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरडी शहरातील ग्रीन अँड क्लीन शिरडी फाऊंडेशन यांच्या संकल्पनेतून याही वर्षी ना नफा ना तोटा या तत्त्वावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्री शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. या प्रसंगी प्रांताधिकारी माणिक आहेर, शिरडीचे मुख्य अधिकारी सतीश दिघे, ग्रीन अँड क्लीन शिरडी फाऊंडेशनचे पदाधिकारी अजित पारख, जितेंद्र शेळके, तुकाराम घोंडकर, संजय शिरडीकर, ॲडव्होकेट अनिल शेळजवल, भाजप शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट सागर सावकारे, सचिन तांबे आदींसह साईभक्त उपस्थित होते.