कोरपणा तालुक्यातील सांगोला येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांनी ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीचे दालमिया सिमेंट कंपनीला वाटप करण्याच्या निर्णयाविरोधात 23 सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आज 29 सप्टेंबर रोजी उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे याच उपोषणाच्या न्याय द्यावा याकरिता काँग्रेस पक्ष व सांगोला ग्रामस्थ 29 सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन केले हे आंदोलन चार तास चालले