उदगीर शहरातील चर्च रोड येथे दुचाकीच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ३० सप्टेंबर रोजी आरोपीने त्याच्या ताब्यातील एम एच २४ बीक्यू ४५८२ क्रमांकाची दुचाकी हयगय व निष्काळजीपणाने भरधाव वेगाने चालवून एम एच २४ एझड ६५२१ या स्कुटी चालकाला जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले याप्रकरणी शामद जलील बागवान यांच्या फिर्यादी वरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय