मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. राष्ट्रीय महामार्गावर माजीपाडा ते फाऊंटन हॉटेल परिसरात वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वाहनचालक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.