सुप्रीम कॉलनी परिसरातून एक महिला आपल्या दोन मुलींना घेऊन घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. या तिघीही कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.