मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागात "पोलीस काका – पोलीस दीदी" हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाअंतर्गत निर्भया व दामिनी पथकातील अधिकारी शाळांमध्ये थेट भेट देऊन संवाद सत्र मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यात येणार आहे.