11 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार तेलंगखेडी गार्डन जवळून अंबाझरी पोलिसांनी कुख्यात आरोपी भांजाला त्याच्या अल्पवयीन साथीदारासह ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून तीन गुन्ह्यांचा खुलासा करण्यात आला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.