शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संघटनात्मक बैठकीचे मनोहर येथे आयोजन करण्यात आले. योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रोजगार हमी योजना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गटाचे नेते रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीस जिल्हाप्रमुख कुंदन संखे,वसंत चव्हाण, आमदार राजेंद्र गावित आमदार विलास तरे शिंदे गटाचे पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.