क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम , जिल्हा क्रीडा परिषद वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, योगासन, कॅरम, क्रिकेट, मैदानी खेळ, बुद्धिबळ अशा साहसी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.