ग्रामीण भागात असलेल्या सांस्कृतिक सभागृह वेलतुर येथे ग्रामपंचायत च्या वतीने 29 आगस्ट शुक्रवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास सरपंच सुशील रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.सदर ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.