लालवाडी तांड्यात दुर्दैवी घटना; 12 वर्षीय चिमुकल्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू अंबड तालुका प्रतिनिधी – लालवाडी तांडा शिवारातील गट क्र.189 मधील पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय रणीवर विलास राठोड या सहावीतील विद्यार्थ्याचा आज (दि. 4 ऑक्टोबर 2025) दुपारी बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रणीवर दुपारी 12:30 वाजता पोहण्यासाठी तलावात गेला होता. मात्र तो परत न आल्याने गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गावातील तब्बल 20 ते 25 तरुणांनी तलावात उतरून शोधमोहीम सुरू केली.