दारव्हा, नेर रस्त्यावर असलेल्या डोल्हारी येथील पुलावरून पावसाळ्यात नेहमीच पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे अडा नदीवरील या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे दिग्रस विधानसभा प्रभारी बिमोद मुधाने यांनी आज दिनांक एक ऑक्टोबरला दुपारी एक वाजता दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.