गणेशोत्सवात महावितरणची तत्परता; अवघ्या दोन तासांत बसवला नवीन ट्रान्सफॉर्मर गणेशोत्सव सुरू असताना शहरातील आझाद चौक परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मात्र, महावितरण कार्यालयाच्या तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांत जुना, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. महावितरणच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात दुपारी अचानक आझाद चौकातील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला.