बार्शी तालुक्यात नारीवाडी येथे एका पतीने गावातील व्यक्तीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. बालाजी महादेव शिंदे वय ४२ असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मृताचा भाऊ लक्ष्मण महादेव शिंदे यांनी पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील आरोपी हा मृताची पत्नी हिच्यावर वाईट नजर ठेवत होता. त्याने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत धमक्या दिल्या होत्या. तुझा व तुझ्या नवऱ्याचा खून करण्याची धमकी दिली होती. हनुमंत वाघ अस आरोपीच नाव आहे.