गावा लगतच्या शेताशिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गावालगत शेती असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात दिवसा व रात्रीच्या सुमारास लागवडीखालील पिकांना सिंचन सुविधा सह पिक पाहणी करण्यासाठी जात असतात मात्र गावालगाच्या शेत शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण पसरले आहे. हे भीतीचे वातावरण भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गराडा मेंढा येथील नागरिकांमध्ये पसरले आहे.