आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास बदलापूर मध्ये मच्छरांची फौज दिसून आली असून स्वच्छता राखण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. बदलापूर येथील शनीनगर परिसरातील नाल्यानजीक असलेल्या इमारतीच्या वर मच्छरांचा थवाच्या थवा उडताना व्हिडिओ मध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ बघून तरी परिसराची स्वच्छता राखावी अशी मागणी नागरिक करत आहेत.