सांगोला शहरातील स्टेशन रोडवरील द मोबाईल स्पेस दुकानात मध्यरात्री मोबाइल चोरी करताना चोरटा पकडला आहे. त्याच्याकडून १ लाख ५९ हजारांचे ११ महागडे मोबाइल चोरी करून दुकानाच्या बाहेर पडताना मालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विजय कुंडलिक राऊत यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.