जळगाव शहरापासून जवळ असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात रविवारी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता 'बाल प्रेरणा पर्व' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मंदिरामध्ये दर रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत मुलांसाठी बाल संस्कार केंद्र चालवले जाते. यामध्ये मुलांना हिंदू धर्माचे श्लोक, भजन आणि कीर्तन शिकवले जातात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच भारतीय संस्कृती आणि संस्कारांची रुजवणूक होते.