घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील पिंपरखेड बु येथे आमदार हिकमतदादा उढाण यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात भगवान बाबा मंदिर येथील भव्य डोम, पुंडलिक मंदिरासमोरील नरोळा नदीवरील घाट, तसेच गावांतर्गत सुसज्ज रस्ते व पेव्हर ब्लॉक या महत्त्वपूर्ण कामांचे उद्घाटन तसेच भुमिपुजन करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.