हिंगोली मध्यवर्ती रोपवाटिकेतील मजुरांचे गेल्या चार ते पाच महिन्यापासून अद्याप वेतन मिळाले नाही, त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ते वेतन तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी आज दोन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून वनविभागीय कार्यालयाच्या समोर महिला कामगाराच्यावतीने उपोषण करण्यात येत आहे. जोपर्यंत आम्हाला वेतन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असाही इशारा त्यांनी दिला आहे.