गडचिरोली अतिदुर्ग जिल्हा असून जिल्ह्यात दळणवळणाकरीता रस्ते हाच प्रमुख मार्ग आहे, मात्र गडचिरोली -चामोर्शी रस्त्यावरील शिवनी जवळील पोटफोडी नदी व तळोधी येथील पोर नदीवरील अर्धवट असलेले पुलियाचे काम यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.