सुस-नांदे रोड व सनीज वर्ल्ड खिंडी परिसरातील वाढती वाहतूककोंडी तसेच सुस रोड, भोते वस्ती येथील ओढ्याच्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा म्हणून रुंदीकरणाची कामे लवकरच सुरू होणार आहेत. या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आमदार शंकर मांडेकर यांनी पाहणी केली.